Kalyan Crime

Kalyan Crime: खळबळजनक ! कल्याणमध्ये एकतर्फी प्रेमातून 12 वर्षांच्या मुलीची हत्या

992 0

कल्याण : कल्याणमधील (Kalyan Crime) तिसगाव परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Kalyan Crime) एका तरुणाने बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीची चाकूने वार करून हत्या केली आहे. त्या तरुणानं अल्पवयीन मुलीवर चाकूनं सात ते आठ वार केले. त्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू झाला आहे. आजूबाजूच्या लोकांनी आरोपी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. आदित्य कांबळे असे आरोपी तरुणाचे नाव आहे.

काय घडले नेमके?
काल संध्याकाळी सात वाजल्यापासून आरोपी आदित्य दुर्गा दर्शन सोसायटीच्या आवारात येऊन रहिवाशांना संबंधित मुलगी घरी किती वाजता येते याची माहिती घेत होता.रहिवाशांना तो कशासाठी माहिती घेतो याची जाणीव झाली नाही. आदित्य मृत मुलगी राहत असलेल्या सोसायटी परिसरात दबा धरुन बसला होता.मृत मुलगी बुधवारी रात्री आठ वाजता आपल्या आई सोबत खासगी शिकवणी वर्गावरुन घरी येत होती. सोसायटीतील जिन्यातून घरात जात असताना आदित्यने पाठीमागून येऊन मुलीच्या आईला ढकलून देऊन मुलीवर चाकूने आठ वार केले. तिच्या आईने मुलाला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र बेभान झालेल्या मुलीच्या आईला दाद दिली नाही. छातीवर घाव झाल्याने मुलगी जिन्यात कोसळली. आईने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले.

या हल्ल्यानंतर (Kalyan Crime) आदित्य पळून जात असताना नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपी आदित्यने हल्ल्यानंतर फिनेल प्यायले. त्यामुळं त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याने नेमकी कोणत्या कारणातून हत्या केली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र आरोपी आदित्य हा मागच्या काही दिवसांपासून पीडित मुलीचा पाठलाग करत होता अशी माहिती आजूबाजूच्या नागरिकांकडून देण्यात आली आहे. हल्लेखोर आदित्यने दोन वेळा प्रेमासाठी गळ घातली होती. मुलीने त्यास नकार दिला होता. तो राग त्याच्या मनात होता. त्या रागातून त्याने हे कृत्य केले असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!