ST Bus Accident

ST Bus Accident : जालना-पुसद मुंबई एसटी बसचा भीषण अपघात; 22 जखमी

11756 0

जालना : राज्यात सध्या अपघाताचे (ST Bus Accident) प्रमाण वाढतच चालले आहे. जालना-पुसद मुंबई एसटीला भीषण अपघात (ST Bus Accident) झाला आहे. एका आयशरला ओव्हरटेक करताना एसटी 30 फूट खाली कोसळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 22 जण जखमी झाले आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या केंदळी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे.

पुसदवरून मुंबईकडे जाणारी एसटी बस रस्त्याच्या बाजूला 30 फूट खाली कोसळली. या अपघातात 22 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एसटी बसमध्ये एकूण 42 प्रवासी होते. केंदळी फाट्याजवळ पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी समोर असलेल्या आयशरला ओव्हरटेक करताना हा अपघात झाला.

एसटी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळं हा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने प्रवाशांना बाहेर काढून मंठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी हलवण्यात आलं. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पांचाळ आणि पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी जिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!