Jalgaon News

Jalgaon News : कुटुंबाचे आधार हरपले ! देवदर्शनाला जाताना दोघां भावांचा करुण अंत

6688 0

जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Jalgaon News) मित्रासोबत दर्शनासाठी जाणाऱ्या सावदा येथील दोन सख्या चुलत भावांचा अपघाती मृत्यू झाला आहे. ट्रकने दिलेल्या धडकेत या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी वरणगाव गावानजीक असलेल्या बोहर्डी फाट्यावर घडली आहे. भास्कर पांडुरंग कुंभार आणि लखन पंकज कुंभार असे या अपघातात मृत पावलेल्या दोन्ही भावांची नावे आहेत.

काय घडले नेमके?
रावेर तालुक्यातील सावदा येथील इंदिरा गांधी चौकातील कुंभारवाड्यातील रहिवासी भास्कर पांडुरंग कुंभार आणि लखन पंकज कुंभार यांच्यासह दोन मित्र शनिवारी सकाळी बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे मारुती येथे दर्शनासाठी एमएच 19 डीएम 8789 या क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. यादरम्यान मागून येणाऱ्या ट्रकने बोहर्डी गावाजवळ बाबा ढाब्यासमोर दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील भास्कर पांडुरंग कुंभार आणि लखन पंकज कुंभार हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले.

दोघेही मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते आणि कुटुंबाचे आधार होते. त्यांच्या या अचानक झालेल्या अपघाती निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे सावदा परिसरात शोककळा पसरली आहे. याबाबत भूषण किशोर पूर्वी (रा. सावदा ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून वरणगाव पोलिसांत अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!