Murder

Jalgaon Crime : नवऱ्यानं स्वत:साठी आणलेली दारू बायको प्यायली; अन्…

582 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये भुसावळ तालुक्यातील हतनूत गावात स्वत:साठी आणेलेली दारू बायको प्यायल्याने संतापलेल्या नवऱ्याने तिची निर्घृणपणे हत्या केली आहे. एवढेच नाहीतर त्याने आपला गुन्हा बाहेर येऊ नये म्हणून त्याने आपल्या बायकोचा सर्पदंशाने मृत्यु झाल्याचा बनाव रचला. परंतु, शवविच्छेदनाच्या अहवालात मारहाण आणि गळा दाबल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्यानेच पत्नीची हत्या केली असल्याचे कबुल केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

जितेंद्र गंगाराम हेमब्रम असे हत्या करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा असून तो पत्नी शांतीदेवी हिच्यासोबत सोबत भुसावळ तालुक्यातील हतनूर गावात राहत होता. हतनूर धरणाच्या वाढीव दरवाजाचे काम गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. याच ठिकाणी जितेंद्र हेमब्रम आणि शांतीदेवी हे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते.

दरम्यान, रविवारी दुपारी हेमब्रमने स्वत:साठी दारू आणली. मात्र, ही दारू शांतीदेवी प्यायली. यामुळे हेमब्रमला राग अनावर झाला. त्याने शांतीदेवीला कमरेच्या पट्ट्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच तिचा गळा आवळला. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.

Share This News
error: Content is protected !!