Jalgaon News

Jalgaon News : रस्त्यावरील मोकाट कुत्र्यामुळे जळगावमध्ये महिलेला गमवावा लागला जीव

5498 0

जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये रस्त्यावरील मोकाट कुत्र्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. हि घटना म्हसावद (ता. जळगाव) फाट्याजवळ घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
चित्राबाई शालीग्राम पाटील (वय 30) असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे. चित्राबाई या परिवारासह अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथे वास्तव्यास होत्या. 30 सप्टेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास त्या मामेभाऊ व मुलासोबत दुचाकीने जात होत्या. त्यावेळी दुचाकीसमोर अचानक कुत्रा आडवा आला. त्यामुळे अचानक ब्रेक दाबल्याने दुचाकी घसरून चित्राबाई खाली पडल्या. दुचाकीसह घसरत जावून आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मागे एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मुले झाली पोरकी
दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मृत पावलेल्या चित्राबाई यांच्या पतीचे दोनच महिन्यांपूर्वी निधन झाले होते. आता त्यांचे निधन झाल्याने त्यांची दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!