Jalgaon Accident News

Jalgaon Accident News : ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

674 0

जळगाव : जळगाव (Jalgaon Accident News) जिल्ह्यामधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरखाली चिरडून एका 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

काय घडले नेमके?
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातल्या निमगाव येथे भरधाव ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर खाली आल्याने 12 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आनंद रघुनाथ सोनवणे असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघाताची माहिती मिळताच यावल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाचा मृतदेह हा यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. तसेच ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे निमगाव या गावात शोककळा पसरली आहे.

 

Share This News
error: Content is protected !!