Jalgaon News

Jalgaon News : शिवलिंग घेण्यासाठी निघालेल्या भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

700 0

जळगाव : जळगावमधून (Jalgaon News) अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगाव शहरापासून जवळच असलेल्या बांभोरी गावाजवळ हा भीषण अपघात झाला आहे. वाळूचा ट्रक आणि भाविकांच्या क्रुझर कारमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातात क्रुझरमधील तीन भाविक जागीच ठार झाले असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

कसा झाला अपघात?
हाती आलेल्या माहितीनुसार भाविकांनी भरलेली क्रुझर गाडी शिवलिंग आणण्यासाठी ओंकारेश्वर या तीर्थक्षेत्रावर जात होते. जळगावातून निघाल्यानंतर काही अंतरावर गाडीचा भीषण अपघात झाला. क्रुझरमधील तीन भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तुषार जाधव वय (वय 25), विजय चौधरी (वय 42), भूषण खंबायत (वय 45) अशी या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या अपघातात अजून 4 जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

या अपघाताची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी दोन्हीही अपघातग्रस्त वाहनं जप्त केली. अपघातग्रस्त ट्रक हा अवैधपणे वाळूची वाहतूक करत असल्याची माहिती समोर आली आहे. अपघात इतका भीषण होता की यात क्रूझर गाडी ही पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Suhas Patil : इंद्रायणी बालन फाऊंडेशन, पुनित बालन ग्रूपचे कार्य वाखाणण्याजोगे : सुहास पाटील

Pune Fire : पुण्यात गॅरेजमधील 17 चारचाकी वाहनांना भीषण आग

Svastikasana : स्वस्तिकासन म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!