कमाल त्या चोरट्याची ! बाईकचे लॉक तोडता आले नाही म्हणून चाकं काढून नेली
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरमध्ये एक विचित्र चोरीचे घटना उघडकीस आली आहे. शहरातील बीड बायपास रोड वरील अल्पाइन हॉस्पिटल समोर एका चोरट्याने बाईक चोरण्याचा प्रयत्न केला. पण बाईक चोरता येईना म्हणून त्यांनी दोन्हीही टायर चोरून नेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दीड बायपास रोडवरील अल्पाइन हॉस्पिटल समोर एका रुग्णाच्या नातेवाईकांनी आपली हिरो होंडा कंपनीची दुचाकी गेट समोर लावली होती. काही अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. पण दुचाकीचा लॉक तुटलं नाही. त्यामुळे चोरट्यांनी दोन्हीही टायर खोलून नेले आणि दुचाकी जागेवरच सोडून दिली आहे.
शहरात सध्या दुचाकी चोरींचं प्रमाण वाढलं असल्याचं समजतंय. अशातच आता बाईकचे लॉक उघडले गेले. नाही म्हणून चोरट्यांनी थेट टायर लंपास केले आहेत.
