IPL

गुजरात-चेन्नई सामन्यापूर्वी पोलीसांनी केला बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश

782 0

नवी दिल्ली : आयपीएल 2023 (IPL 2023) सध्या एका रंगतदार वळणावर येऊन ठेपले आहे. यंदाच्या सीझनमध्ये चेन्नई, गुजरात, लखनऊ आणि मुंबई चे संघ क्वालिफायचे सामने खेळणार आहेत. आज गुजरात आणि चेन्नईच्या संघामध्ये पहिला क्वालिफायचा सामना होणार आहे. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी सॉफ्टवेअरच्या मदतीने आयपीएल सामन्यांदरम्यान सुरू असलेल्या मोठ्या बेटिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

या बेटिंग (betting) प्रकरणी पोलिसांनी दिल्लीतील (Delhi Police) शाहदरा येथील राणी गार्डन (Rani Garden) परिसरातून 3 जणांना अटक केली आहे. पंकज बजाज, अजय मल्होत्रा ​​आणि अतुल वर्मा अशी बेटिंग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी चार मोबाईल फोन, चार्जरसह एक डेल आणि एसर लॅपटॉप, वाय-फाय राउटर जप्त केले आहे. या आरोपींवर दिल्ली पब्लिक गॅम्बलींग अ‍ॅक्ट, 1955 च्या कलम 3/4 अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.

Share This News
error: Content is protected !!