Theft Video

Theft Video : सर्वांच्या डोळ्यादेखत चोरट्याने लंपास केला iPhone; चोरीची पद्धत पाहून व्हाल थक्क

1036 0

नवी दिल्ली : तुम्ही आतापर्यंत चोरीची (Theft Video) अनेक प्रकरणे पाहिली असतील. कुणी रात्रीच्या वेळी गुपचूप लपून चोरी करताना, कुणी दिवसाढवळ्या नजर चुकवून चोरी करताना, तर कुणी रस्त्याने चालता चालता चोरी करताना दिसलं. पण सध्या चोरीचा (Theft Video) असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका चोराने आपल्या चलाखीच्या जोरावर सर्वांच्या डोळ्यादेखत आयफोन चोरला आहे. हा चोर अगदी शांतपणे चोरी करून तिथून गप्पपणे निघून गेला आणि कुणाला समजलंही नाही. पण चोराची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ट्रॅक्टरवरची स्टंटबाजी जीवावर बेतली; थरकाप उडवणारा Video व्हायरल

काय आहे व्हिडिओमध्ये ?
या व्हिडिओमध्ये (Theft Video) तुम्ही पाहू शकता कि, एका मोबाईलच्या दुकानात खूप गर्दी दिसते आहे. तिथं एक व्यक्ती अगदी काऊंटरजवळ आहे. त्या व्यक्तीच्या हातात आधीच त्याचा एक मोबाईल आहे. ती विक्रेत्याला आयफोन दाखवायला सांगते. विक्रेता त्याला आयफोन काढून देतो. ती व्यक्ती आपला मोबाईल आणि आयफोन दोन्ही आपल्या हातात धरते.

थोडा वेळा ती फोनला पाहिल्यासारखं करते. नंतर कुणाचं लक्ष नाही हे समजून तो आयफोन घेऊन गर्दीतून बाहेर पडताना दिसते. त्याच्या या चोरीची संपूर्ण घटना दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. नॉटीफॅमिली या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ (Theft Video) पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून लोकांनी यावर मजेशीर कमेंट द्यायला सुरुवात केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!