Pune Crime

Pune Crime : मित्राने केला घात ! किशोरला गाडीवर बसवून मुळशी धरणाजवळ नेलं अन्….

8141 0

पुणे : पुण्यामधून (Pune Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये मित्रानेच मित्राचा काटा काढला आहे. या घटनेने मुळशी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. किशोर प्रल्हाद पवार (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर अक्षय भास्कर खिल्लारे (वय 21) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अक्षय आणि किशोर हे दोघे मित्र होते.

काय घडले नेमके?
आरोपी अक्षय याने किशोरला माझ्यासोबत चल असे म्हणून त्याला सोबत घेतलं आणि सुस गावातून गाडीवर घेऊन वारक या गावाजवळ आला. गावाजवळ असणाऱ्या मुळशी धरणाच्या पाण्याजवळ घेऊन आला. लघुशंका करण्याच्या निमित्ताने त्याने किशोर याच्या पाठीमागून त्याच्या मानेवर आणि चेहऱ्यावर विळ्याने वार केले. या हल्ल्यात किशोरचा जागेवरच मृत्यू झाला. मात्र, मृतदेह कुणाला सापडू नये म्हणून त्याचे हात पाय कपड्याने बांधून त्याचा मृतदेह मुळशी धरणात फेकून दिला होता. पत्नी सोबत असलेल्या अनैतिक संबंधातून अक्षयने आपल्या मित्राचा खून केला.

यादरम्यान किशोर बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या पत्नीने हिंजवडी पोलिसात दिली होती. त्यानुसार, पोलिसांनी तपास सुरू केला होता. तपास करत असताना पोलिसांना किशोर हा अक्षय सोबत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला. हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!