Pimpri Chinchwad

Pimpri Chinchwad : पिंपरीमध्ये आयटी तरुणीची हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार; CCTV फुटेज आलं समोर

524 0

पिपंरी : सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तरुणीच्या हत्येमुळे पिंपरी शहर (Pimpri Chinchwad) हादरलं होतं. ओयो रूम्समध्ये बॉयफ्रेंडने या तरुणीची गोळ्या झाडून हत्या केली होती. पिंपरी चिंचवड शहरात हिंजवडी परिसरात ओयो हॉटेलमध्ये तरुणीचा मृतदेह आढळला. या तरुणीची मध्यरात्री गोळ्या झाडून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.वंदना दिवेदी (वय 26 वर्ष) असं हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. वंदना दिवेदी मागील दोन दिवसापासून तिच्या मित्रासोबतसुपर ओयो टाऊन हाऊस इम्पेरियल या लॉज मध्ये वास्तव्यास होती.

वंदना दिवेदी ही साँफ्टवेअर इंजिनिअर होती. लखनऊवरुन आलेल्या ऋषभ निगम याने तिची हत्या केली. यानंतर तो पळून मुंबईला जाण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच आरोपीने गुन्ह्यासाठी वापरले गेलेले पिस्टल देखील जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणात आता एक CCTV फुटेज समोर आले आहे.

काय आहे CCTV मध्ये?
हिंजवडी परिसरातील ओयो टाऊन हाऊस नामक हॉटेलच्या रूम नंबर 306 मध्ये ही घटना घडली. आपल्या प्रेयसीच्या डोक्यात दोन गोळ्या झाडून, ती मयत झाली का हे तपासून ,कुणाचीही भीडभाड न बाळगता अतिशय शांतपणे ऋषभ निगम हॉटेलमधून निघून गेला. मूळचा लखनौ शहरातील रहिवासी असलेला ऋषभ त्याची मैत्रीण वंदना दिवेदीला भेटायला आला होता. मात्र रूममध्ये जाताच दोघांमध्ये वाद झाला आणि कशाचाही विचार न करता ऋषभने सोबत आणलेल्या पिस्तुलातून वंदनावर गोळ्या झाडल्या.प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे समजत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sanjay Raut : मुख्यमंत्री राजकारणातील सगळ्यात मोठं ढोंग; संजय राऊत यांची टीका

Cashback : UPI वरुन ट्रांझेक्शन केल्यास ‘ही’ बँक देतेय दरमहा 625 रुपये कॅशबॅक

Car Accident News : भरधाव कारची कंटेनरला धडक; कारचालकाचा जागीच मृत्यू

Money : 1 फेब्रुवारीपासून बदलणार पैशांशी संबंधित ‘हे’ 6 नियम

Maharashtra Weather Update: महाराष्ट्र गारठणार ! ‘या’ तारखेपर्यंत राज्यात असणार थंडीचा मुक्काम

Blood Donation : सुरेंद्र पठारे फाउंडेशनच्या वतीने खराडीत विक्रमी 3671 जणांचे रक्तदान

Nitish Kumar : बिहारच्या राजकारणात ‘खेला खोबे’! नितीशकुमार यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!