Hingoli News

Hingoli News : पिकअप आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात; बाईकचालकाचा जागीच मृत्यू

499 0

हिंगोली : राज्यात अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. हिंगोलीमधील (Hingoli News) सेनगाव राष्ट्रीय महामार्गावर भरधाव पिकअपचा आणि मोटारसायकलचा अपघात‌ झाला आहे. अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. काल सायंकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावातील नागरिक संतप्त झाले आणि त्यांनी पिकअप गाडी पेटवून दिली. या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

काय घडले नेमके?
या अपघातामध्ये राहोली बुद्रुक येथील श्रीरंग दत्तराव डोरले (50) यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हिंगोली येथे कामासाठी म्हणून गेलेले डोरले हे रात्री आपल्या मोटारसायकलवरून गावाकडे परतत होते. यावेळी राहोली पाटीलजवळ आले असताना भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने त्यांच्या मोटरसायकलला धडक दिली. या अपघातात श्रीरंग डोरले यांचा जागीच मृत्यू झाला. यानंतर पिकअपच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

यानंतर गावकऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यामध्ये संतप्त गावकऱ्यांनी उभ्या असलेल्या पिकअपला पेटवून दिले. या प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील उपाधिक्षक सुरेश दळवी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले उपनिरीक्षक मगन पवार आदीच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी गावकऱ्यांना शांत करून घटनास्थळावरची परिस्थिती आटोक्यात आणली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Pune News : 40 फुट खोल पाण्याच्या टाकीत पडलेल्या 16 वर्षाच्या मुलीला अग्निशमन दलाच्या जवानांकडून जीवदान

Pune Accident : पुण्यात स्कुल बसचा भीषण अपघात; CCTV फुटेज आले समोर

Dinesh Phadnis Pass Away : CID फेम दिनेश फडणीस उर्फ ‘फ्रेड्रिक्स’ यांचे निधन

Cyclone Michaung : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस पडणार मुसळधार पाऊस

Crime News : छ. संभाजीनगर हादरलं ! ‘या’ शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची हत्या

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!