Hingoli News

Hingoli News : कूलरची हवा बेतली जीवावर !14 वर्षीय विद्यार्थ्यांला गमवावा लागला जीव

622 0

हिंगोली : हिंगोलीमधून (Hingoli News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये कूलरमुळे एका 14 वर्षीय मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे मुलाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तरुण मुलाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
गणेश खिल्लारी असे मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे. सेनगाव तालुक्यात सुकळी खुर्द या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. उन्हाळा सुरू असल्याने घरात कुलर, एसी अशा गोष्टींचा वापर केला जातो. घरात जास्त गरम होत असल्यानं गणेश कुलर लावण्यासाठी गेला आणि त्याने आपला जीव गमावला.

कुलरमध्ये पाणी घातल्यानंतर गणेशला वीजेचा जोरदार धक्का बसला. शॉक लागताच गणेश जमिनीवर कोसळला. त्याचा आवाज ऐकून घरातील लोक तिथे आले. त्यांनी वीजपुरवठा बंद केला आणि गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुकळी गावात घडलेल्या घटनेनंतर सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Accident News : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर पहाटेच्या सुमारास खाजगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Share This News
error: Content is protected !!