Hingoli News

Hingoli News : भाजप आमदाराकडून नरसी नामदेव संस्थेच्या विश्वस्ताला बेदम मारहाण

620 0

हिंगोली : भाजप आमदार तानाजी मुटकुळे आणि त्यांच्या समर्थकांनी हिंगोलीच्या (Hingoli News) नरसी नामदेव संस्थांच्या विश्वस्ताला बेदम मारहाण केली आहे. अंबादास गाडे असं मारहाण झालेल्या विश्वस्ताचे नाव आहे. गाडे यांच्यावर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाठीमध्ये खुर्च्यांनी मारहाण केल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
नरसी नामदेव संस्थां समितीच्या कामांचा हिशोब घेण्यासाठी 18 सप्टेंबर रोजी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत हिशोब विचारण्यावरून नरसी नामदेव येथील संस्थांचे विश्वस्त अंबादास गाडे यांना भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी बेदम मारहाण केली. देशभरामध्ये परिचित असलेल्या संत नामदेव यांच्या जन्म गावी नरसी नामदेव येथे नामदेव महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धाराचे काम सुरू आहे.

या कामासंदर्भामध्ये जीर्णोद्धार समितीचा हिशोब मागण्यासाठी विश्वस्त मंडळीच्या वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाजप आमदार तानाजी मुटकुळे हे त्यांच्या समर्थकांसह उपस्थित होते. यावेळी विश्वस्त मंडळींनी जिर्णोद्धार समितीच्या कामाचा हिशोब मागितला असता आमदार मुटकुळे यांना राग अनावर झाला आणि त्यांनी चक्क विश्वस्तालाच बेदम मारहाण केली आहे.

Share This News
error: Content is protected !!