Hingoli Accident

Hingoli Accident : हिंगोलीमध्ये भीषण अपघातात शिक्षक दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू

6596 0

हिंगोली : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण काही थांबायचे नाव घेईना. हिंगोलीमध्ये (Hingoli Accident) अशीच एक अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात (Hingoli Accident) शिक्षक दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डिव्हायडरला कार धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात शिक्षक पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काय घडले नेमके?
आज सकाळच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील शिवनी फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर कार तीन-चार पलटी घेऊन रस्त्याच्या बाजूला येऊन थांबली. या अपघातामध्ये कारमध्ये असलेले शिक्षक पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तर कार चालवत असलेला त्यांच्या मुलाला गंभीर मार लागला आहे. जयप्रकाश कावरखे आणि मंजुषा कावरखे असे मृत शिक्षक पती पत्नीचे नावं आहे. तर पराग कावरखे असे जखमी मुलाचे नाव आहे.

शिक्षक पती पत्नी आणि त्यांचा मुलगा तिघेजण या कारमधून प्रवास करत होते. नांदेडहून कळमनुरीच्या दिशेने ते येत होते. दरम्यान, कळमनुरी जवळ कारचे नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्ता दुभाजकावर जाऊन धडकली. या अपघातामध्ये कार दोन ते तीन वेळा पलटी मारत रस्त्याच्या 100 फूट बाजूला जात पडली. या अपघातामध्ये पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर त्यांच्या मुलाला नांदेड येथील रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!