Gujrat Viral Video

Gujrat Viral Video : जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत टोळक्याकडून मुस्लिम तरुणाला बेदम मारहाण

760 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातमध्ये (Gujrat Viral Video) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये जय श्री रामचा नारा देण्यास सांगत एका मुस्लीम तरुणाला टोळक्याकडून मारहाण करण्यात आली आहे. सध्या सोशल मीडियावर या मारहाणीचा व्हिडिओ (Gujrat Viral Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

काय घडले नेमके?
गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील दिओदर तहसील परिसरातील ही घटना आहे. यामध्ये तीन तरुण एकाला जय श्रीरामचा नारा देण्यास सांगत आहेत. तसेच, जोपर्यंत जय श्री राम म्हणत नाही, तोपर्यंत त्याला लाठ्या-काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. आमदार जिग्नेश मेवानी यांनी आपल्या ट्विटरवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://twitter.com/jigneshmevani80/status/1687081524456534016

जिग्नेश मेवानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले कि, “हे दोन व्हिडीओ आमच्या प्रगतशील गुजरातमधील (Gujrat Viral Video) बनासकांठ जिल्ह्यातील दिओदर तहसील येथील आहेत. यात एका मुस्लीम तरुणाला तथाकथित गो-रक्षकांनी मारहाण केली आहे. जय श्री राम बोलत नाही, तोपर्यंत या तरुणाला मारहाण करण्यात आली.” “याप्रकरणी गुजरातचे पोलीस महासंचालक यांची भेट घेत आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करणार आहे,” असेदेखील जिग्नेश मेवानी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.

Share This News
error: Content is protected !!