Gujarat News

Gujarat News : गुजरातमध्ये नाव उलटून 10 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

721 0

वडोदरा : गुजरातमधील वडोदरामध्ये (Gujarat News) बोट तलावात उलटून झालेल्या भीषण अपघातात 10 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत दोन शिक्षकांचा सुद्धा मृत्यू झाला. हरणी तलावात बोट उलटली. या बोटमध्ये 23 विद्यार्थी आणि चार शिक्षक होते. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व विद्यार्थी वडोदरा येथील एका शाळेतील आहेत. बचावकार्यात 13 मुलं आणि दोन शिक्षकांना वाचवण्यात यश आलं आहे.

“वडोदराच्या हरणी तलावात बुडून मुलांची बातमी खूप दुःखद आहे. ज्यांनी जीव गमावला त्या मुलांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी मी प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी मी दु:खी आहे.” असे ट्विट करून सीएम भूपेंद्र पटेल यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला.

Share This News
error: Content is protected !!