Gondia News

Gondia News : बंद पडलेली गाडी दुरुस्त करण्यासाठी थांबले अन् गमावला जीव

478 0

गोंदिया : गोंदियामधून (Gondia News) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्याच्या देवरी शहरातुन गेलेला राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. देवरी शहरालगत असलेल्या धोगीसराळ गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर गाडी बिघडल्याने वाहनचालक गाडी दुरुस्त करत होता.

यादरम्यान एका भरधाव ट्रकने त्याला जोराची धडक दिली. हा ट्रक रायपुरच्या दिशेने जात होता. ही धडक एवढी भीषण होती कि, या अपघातात 3 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या अपघातातील मृतांची अद्याप ओळख पटलेली नाही. या अपघाताची माहिती मिळताच देवरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. देवरी शहरातून गेलेल्या या राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी अशी मागणी प्रवाशांकडून आणि नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!