Gondia Crime

Gondia Crime : गोंदिया हादरलं ! ‘या’ प्रकारे मुलाने घेतला 30 वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला

720 0

गोंदिया : गोंदियामधून (Gondia Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका मुलाने 30 वर्षांपूर्वी झालेल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेतला आहे. एवढचं नाहीतर आरोपी मुलाने आपल्या वडिलांचा बदला घेतल्यानंतर अपघाताचा बनाव रचला. परंतु मृताची स्थिती, घटनास्थळावरील भौतिक पुरावे व शेजारी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यावर फुलचूरटोला ते पिंडेकपार या रस्त्यावर झालेला अपघात हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पोलिसांनी सुनील भोंगाडे व शाहरुख शेख या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

काय घडले नेमके?
29 नोव्हेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 ते 6:30 वाजेदरम्यान गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या फुलचुरटोला ते पिंडकेपार रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झाला होता. या अपघातामध्ये मोरेश्वर खोब्रागडे (रा. चंद्रशेखर वॉर्ड, श्रीनगर गोंदिया) यांचा मृत्यू झाला. मात्र, हा अपघात संशयास्पद असल्याने खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात कलम 302, 341, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.

या कारणामुळे केली हत्या?
आरोपी सुनील भोंगाडे याच्या वडिलांचा खून 30 वर्षांपूर्वी झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी सुनील आठ दिवसांपासून मोरेश्वर खोब्रागडे यांच्या मागावर होता. संधी मिळताच त्याने खोब्रागडे यांची हत्या केली आणि अपघाताचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणात 100 ते 150 च्यावर सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषणाची खात्री केल्यानंतर आरोपी सुनील धनिराम भोंगाडे (44, रा. शास्त्री वॉर्ड गोंदिया) व त्याच्या दुकानात काम करणारा साथीदार आरोपी शाहरूख हमीद शेख (24, रा. कुऱ्हाडी) यांना अटक केली.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

WPL Auction 2024 : मुंबई इंडियन्सने कोट्यवधींची बोली लावून ‘या’ साऊथ आफ्रिकेच्या फास्ट बॉलरला घेतले संघात

Pune News : ना. चंद्रकांतदादा पाटील आयोजित चाणाक्य नाट्यप्रयोगास प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

WPL 2024 Auction : आज पार पडणार महिला प्रीमियर लीग 2024 चा लिलाव; ‘या’ खेळाडूंवर असणार सगळ्यांची नजर

NIA Raid : मुंबई, पुणे, ठाणे या ठिकाणी NIA ची छापेमारी; ISIS शी संबंधित 13 जणांना अटक

Raigad News : रायगड पोलिसांची मोठी कारवाई ! 106 कोटींचे ड्रग्स जप्त

Robbery News : दर 2 वर्षांनी महाराष्ट्रातील ‘या’ बँक शाखेत पडतो दरोडा

Pune NIA Raid : इसिस मॉड्युल प्रकरणात NIA ची पुण्यात मोठी कारवाई; 3 जणांना अटक

Wife Murder : धक्कादायक ! दारूसाठी पैसे न दिल्याने पतीकडून पत्नीची हत्या

Jalgaon News : वडिलांसोबत शाळेत जाताना चिमुकलीचा नियतीने केला घात; कुटुंबाकडून मन हेलावून टाकणारा आक्रोश

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!