Gadchiroli Crime

Gadchiroli Crime : गडचिरोली हादरलं ! ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची हत्या

427 0

गडचिरोली : गडचिरोलीमध्ये (Gadchiroli Crime) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये ठाकरे गटाच्या एका महिला नेत्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे हि हत्या तिच्या पतीनेच केली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपीने पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
गडचिरोलीच्या कुरखेडा येथील शिवसेना ठाकरे गटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद हिची तिच्या पतीने चाकूने भोसकून हत्या केली आहे. हा थरार मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास घडला आहे. पहाटेच्या सुमारास राहतच्या वडिलांनी उठून पाहिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला आहे. हत्येनंतर आरोपी पतीने पोलीस ठाण्यात जात या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.

पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास राहत यांचे वडील नजद गुलाब सैय्यद झोपेतून उठल्यानंतर त्यांना राहत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नजद गुलाब सैय्यद हे कुरखेडा येथील निष्ठावान शिवसैनिक असून राहत ही त्यांची मुलगी होती. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती ताहेमिम शेख याने नदीवर जाऊन आंघोळ केली आणि रक्ताने माखलेले कपडे धुतले. तेथून त्याने सरळ पोलीस ठाणे गाठून पोलिसांना जाऊन हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांनीच लगेच ताहेमिमला अटक केली. ताहेमिम याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!