Beed:

येरवड्यात भर रस्त्यात दोन गटांत ‘फ्री स्टाईल’ हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

491 0

 

पुणे: पुण्यातल्या येरवड्यातील शिवराज चौक रस्त्यावर दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली. भर रस्त्यातील हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

येरवडा इथल्या शिवराज चौक रस्त्यावर हा प्रकार घडला.याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या हाणामारीत मुक्तार सिंग भादा यांच्यासह इतर गंभीर जखमी झाले आहेत. हा प्रकार जागेच्या वादातून घडला आहे. हाणामारी करणारे सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे.येरवड्यात भर रस्त्यात गुन्हेगारांचा हा जीवघेणा प्रकार सुरु असताना देखील पोलिसांचा मात्र गुन्हेगारांवर वचक नसल्याचं नागरिक बोलत आहेत. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय

 

Share This News
error: Content is protected !!