नवी दिल्ली : फसवणुकीच्या (Fraud News) प्रमाणामध्ये मागच्या काही काळापासून खूप वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या श्रेया दत्ताला आपली आयुष्यभराची कमाई खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यामुळे गमवावी लागली आहे. श्रेया दत्ता टेक प्रोफेशनल असून तिला 4 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.
कसा घातला गंडा?
श्रेयाची जानेवारी महिन्यात एका डेटिंग अॅपच्या माध्यमातून एन्सेल नावाच्या एका व्यक्तीसोबत मैत्री झाली. एन्सेलने श्रेयाला तो फ्रान्सचा असल्याचे सांगत त्याचा अल्कोहोलचा व्यवसाय फिलाडेल्फियात असल्याचे सांगितले. अशातच एन्सेल आणि श्रेयामध्ये मैत्री होत एकमेकांचे मेसेजवर बोलणे सुरू झाले. नंतर मैत्री झाल्यानंतर श्रेयाला एन्सलने पैशांसंदर्भात चुना लावला.
श्रेया दत्ताचा घटस्फोट झाला आहे. अशातच तिची एन्सेलसोबत मैत्री झाली. एन्सेलशी बोलताना छान वाटायचे असे श्रेयाने म्हटले आहे. श्रेयाने पोलिसांना सांगितले की, डेटिंग अॅपनंतर दोघे एकमेकांसोबत व्हॉट्सअॅपवरही बोलायचे. डीपफेकच्या मदतीने एन्सेल श्रेयासोबत बोलायचा. श्रेयाने हे देखील सांगितले की, एन्सेलने काही वेळा भेटण्यासाठी देखील विचारले पण त्यासाठी मी नकार दिला. याशिवाय गेल्या वर्षी व्हॅलेंनटाइन डे निमित्त एन्सेलने श्रेयाला एक फुलगुच्छ देखील पाठवला होता.
एन्सेलने श्रेयाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत स्वप्न दाखवली. याशिवाय एन्सेलने तिला मी लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याचे सांगत तुझा काय प्लॅन आहे? असे विचारले होते. यादरम्यान, एन्सेलने श्रेयाला क्रिप्टो करेंसीसंबंधित एका अॅपबद्दल सांगितले. यासंदर्भात एक लिंक देत ती सुरू करत त्यामध्ये पैसे गुंतवल्यास फार मोठा नफा होईल असे सांगितले. सुरुवातीला श्रेयाने काही पैसे टाकले आणि नंतर काढले. श्रेयाला वाटू लागले होते की, खरंच तिला पैशांचा नफा होत आहे. त्यामुळे श्रेयाने आपली संपूर्ण आयुष्यभराची कमाई त्या अॅपमध्ये टाकली. याशिवाय नफा मिळवण्याच्या नादात कर्ज घेऊनही काही पैसे टाकले. यानंतर जेव्हा श्रेयाला त्या अॅपच्या माध्यमातून पैसे काढता आले नाही. तेव्हा श्रेयाला आपली फसवणूक झाल्याचे समजले.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Shilpa Bodkhe : शिल्पा बोडखेंचा शिंदे गटात प्रवेश
Pankaj Udhas Pass Away : ज्येष्ठ गायक पंकज उधास यांचं निधन
Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हा दाखल
Pune Girl Rape : धक्कादायक ! बहिणीच्या मित्राकडून घरात घुसून तरुणीवर अत्याचार
Ind Vs Eng : टीम इंडियाचा ‘ध्रुव’ तारा चमकला; अटीतटीच्या लढतीमध्ये टीम इंडियाचा थरारक मालिका विजय
Pune Crime News : पुणे हादरलं! जंगलात जाऊन पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक! जालन्यातील तिर्थपुरीत एसटी बस पेटवली
Weather Update : आज राज्यातील ‘या’ भागात पाऊस बरसणार; हवामान खात्याने वर्तवला अंदाज