Solapur Accident

Solapur Accident : तुळजापूरला निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात; 4 जणांचा मृत्यू

992 0

सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर (Solapur Accident) एक भीषण अपघात झाला आहे. मोहोळजवळील (Solapur Accident) यावली गावानजीक माल ट्रक व कारच्या धडकेत 4 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. कारमधील सर्वजण तुळजापूरकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला.

आदमअली मुनावरअली शेख (वय 37 ), हिराबाई रामदास पवार (वय 75), कमलाबाई मारूती वेताळ (वय 60 रा. रांजनगाव मशीद ता. पारनेर) व द्वारकाबाई नागनाथ गायकवाड (वय 40 रा. राजंनगाव मशीद) या 4 जणांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सहा जण गंभीर जखमी झाले आहे. बळी बाबू पवार (वय 27), छकुली भीमा पवार (वय 27), साई योगीराज पवार (वय 7 वर्ष), मंदाबाई नाथा पवार (वय 52), सुरेखा भारत मोरे (वय 45), बायजाबाई रामदास पवार (वय 60, सर्व रा. राजंनगाव,जि अहमदनगर ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विविध वॉर्डात उपचार सुरु आहेत.

रांजणगाव (ता. पारनेर जिल्हा अहमदनगर) येथील महिला भाविक कारमधून तुळजापूरला दर्शनासाठी चालल्या होत्या. या कारने यावली गावच्या परिसरात पुणे-सोलापूर महामार्गावर सोलापूरकडे जाणाऱ्या मालट्रकला पाठीमागून भीषण धडक दिली.या अपघातात 4 जणांचा मृत्यू तर 6 जण जखमी झाले आहेत अशी माहिती मोहोळ पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!