CRIME NEWS : चिंचवड येथील एका सोसायटीतील 4 दुकानं चोरट्यांनी फोडली ; सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद…

303 0

चिंचवड : जुन्या मुंबई-पुणे महामार्गालगत चिंचवड येथील एम्पायर इस्टेट सोसायटीतील चार दुकानं दोन अज्ञात चोरट्यांकडून फोडण्यात आली. आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या चोरीच्या घटनेमुळं सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दोन अज्ञात चोरट्यांनी एम्पायर इस्टेट सोसायटीमधील चार दुकानांचे शटर उचकटून चोरी केली मात्र दोन दुकानांत चोरी करण्यात त्यांना अपयश आलं. इतर दोन दुकानांतून मात्र त्यांनी रोकड लंपास केली. विशेष म्हणजे या सोसायटीच्या प्रत्येक गेटवर वॉचमन असतो तरीही चोरट्यांनी दुकानांचे शटर तोडून चोरी केल्याचा प्रकार या ठिकाणी घडला. दुकानमालकांनी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

काही दिवसांपूर्वीच या सोसायटीमधील हल्दीराम या दुकानातही चोरी झाल्याची बातमी समोर आली होती. दरम्यान, एका मेडिकलमधून साडेअकरा हजारांची तर पिझ्झाच्या दुकानातून तीन हजार रुपयांची चोरी झाली आहे. सबवे आणि एम्पायर ऑप्टिकल्स या दुकानांत शटरच्या आतून काचेचा दरवाजा असल्यानं चोरट्यांना दुकानात प्रवेश करता आला नाही. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अद्यापही चोरट्यांची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी चिंचवड पोलीस पुढील तपास करत आहेत.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!