क्राईमठळक बातम्या

#SANGALI : भाजप माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणात भाजप माजी नगरसेवकाचा हात; चार जण ताब्यात

सांगली : जतचे भाजपाचे माजी नगरसेवक विजय ताड यांच्या खून प्रकरणाचा उलगडा करण्यात सांगली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आल आहे. camilla bop house ताड यांच्या खून प्रकरणी 5 जणांची नावे निष्पन्न झाली असून यामध्ये भाजपाचा माजी नगरसेवक उमेश सावंत याचाही समावेश आहे.

पोलिसांनी चार आरोपींना कर्नाटक येथुन ताब्यात घेतलं आहे. माजी नगरसेवक उमेश सावंत हाच या खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याच समोर आल आहे. मात्र खुनाचे कारण अद्यापही अस्पष्ट असल्याच सांगण्यात आल आहे.
मुख्य सूत्रधार माजी नगरसेवक उमेश सावंत हे फरार झाले आहेत. सावंत यांच्या शोधासाठी पथक पाठवण्यात आली असून लवकरच सावंत याना अटक केली जाईल अस सांगलीचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगितल.