Tamil Nadu

Tamil Nadu : दिवाळीसाठी फटाके तयार करत असताना अचानक झाला स्फोट; 9 जणांचा मृत्यू

1074 0

चेन्नई : तामिळनाडूमधून (Tamil Nadu) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या फटाका कारखान्यामध्ये मंगळवारी स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. पहिला स्फोट हा विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशी जवळ एका फटाका कारखान्यात झाला. सुदैवाने या कारखान्यात कोणताही जीवितहानी झाली नाही. तर याच जिल्ह्यातील कम्मापट्टी गावात दुसरा स्फोट झाला. या स्फोटामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

काय घडले नेमके?
शिवकाशीमध्ये अनेक फटाकेचे कारखाने आहे. दिवाळीच्या तोंडावर सर्वत्र फटाक्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. कम्पापट्टी गावात एका फटाका कारखान्यात फटाके तयार केले जात होते. यावेळी अचानक स्फोट झाला, या स्फोटामध्ये 9 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे काम सुरू आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, कारखान्याचं छत हवेत उडून गेलं. त्यावरून या स्फोटाची तीव्रता लक्षात येऊ शकते. या स्फोटातील जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!