आपला महाराष्ट्रक्राईमपुणेव्हिडिओ

Pimpri Chinchwad Fire : पिंपरी चिंचवडमध्ये मेडिकल दुकानाला भीषण आग; संपूर्ण मेडिकल जळून खाक

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Fire) शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नेहरूनगर भागात आज पहाटेच्या सुमारास एका मेडिकल शॉपला अचानक आग (Pimpri Chinchwad Fire) लागली आहे. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेऊन ही आग आटोक्यात आणली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या आगीमध्ये हे मेडिकल शॉप जळून खाक झाले आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.