Delhi Fire

दिल्लीतील कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांनी चौथ्या मजल्यावरुन मारल्या उड्या

423 0

नवी दिल्ली : दिल्लीतील मुखर्जी नगरमधील बत्रा सिनेमाजवळील ज्ञाना इमारतीला आग (Fire) लागली आहे. या इमारतीत अनेक कोचिंग सेंटर्स (Coaching Centre) आहेत.आग लागल्याची माहिती समजताच इमारतीमध्ये एकच गोंधळ उडाला. यामध्ये अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. घाबरलेल्या विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी चौथ्या मजल्यावरुन इमारतीच्या खाली उड्या मारल्या. या भीषण दुर्घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 11 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.

काय घडले नेमके?
दिल्ली विद्यापीठाच्या जवळ असलेल्या ज्ञाना इमारतीत दुपारी 12 च्या सुमारास आग लागली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या इमारतीत कोचिंग सेंटर्सची संख्या जास्त आहे. आग लागल्यानंतर एकच खळबळ उडाली. विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. अनेक जण खिडकीतून बाहेर आले. जीव वाचवण्यासाठी त्यांनी उड्या टाकल्या.तिसऱ्या मजल्यावर असलेल्या विजेच्या मीटरला आग लागली. आग मोठी नव्हती. मात्र धूर अधिक होता. तो सर्वत्र पसरला. त्यामुळे मुलं घाबरली. या दुर्घटनेत 4 विद्यार्थी जखमी झाले.

कोचिंग सेंटरमध्ये लागलेल्या आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात खोल्यांमधून धूर बाहेर पडताना दिसत आहे. अग्निशमन दलाची पथकं सध्या आग नियंत्रणात आणण्याचं काम करत आहेत. काही विद्यार्थी अद्यापही वर्गात अडकले आहेत. त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत. इमारतीवरून खाली उड्या मारल्यामुळे 4 विद्यार्थी जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!