Fight Video

Fight Video : बुलेटचा दुचाकीला धक्का लागल्याने तरुणांची पोलिसांसमोरच जबर हाणामारी

378 0

बुलढाणा : राज्यात गुन्हेगारीचे (Fight Video) प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बुलडाण्यामधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात मलकापूर शहरात प्रकाश पठ्ठे आणि अमोल पठ्ठे यांच्या दुचाकीला राँग साईडने येणाऱ्या बुलेटने मागून धडक दिली. यावरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि त्यांच्यात तुंबळ हाणामारी झाली.

काय घडले नेमके?
दिग्विजयसिंह राजपूत, सतेंद्रसिह राजपूत, प्रतिकसिंह राजपूत यांनी प्रकाश पठ्ठे आणि अमोल पठ्ठे यांना अश्लील शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्या दोघांना जबर मारहाणही केली. या मारहाणीत ते दोघेही जखमी झाले असून यातील प्रकाश पठ्ठे यांना डोक्यावर विट मारण्यात आली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी बुलढाणा येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. विशेष म्हणजे घटनास्थळावर पोलीस कर्मचारीसुद्धा असल्याचं दिसून येत आहे. मात्र, तरीही हे लोक पोलिसांसमोर एकमेकांना मारहाण करत होते. याप्रकरणी दिग्विजयसिंह राजपूत, सतेंद्रसिह राजपूत, प्रतिकसिंह राजपूत यांच्याविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी 324, 294, 504, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Food Poisoning : खळबळजनक ! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत सापडले मेलेल्या उंदराचे अवशेष; 10 विद्यार्थ्यांना विषबाधा

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!