Crime

येरवडा जेलमध्ये जोरदार हाणामारी, दोघा आरोपींना बेदम मारहाण

684 0

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. हा प्रकार येरवडा कारागृहातील किशोर विभागातील बॅरक क्रमांक २च्या जवळील हौदाजवळ घडला. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी आळंदी येथे दोन गटात झालेल्या भांडण प्रकरणात काही जणांना अटक केली होती. त्यानंतर आरोपींना न्यायालयीन कैदी किशोर विभागात ठेवण्यात आले. या विभागात इतरही न्यायालयीन कैदी आहेत. या आरोपींची इतर कैद्यांशी भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरुन त्यांनी कैद्यांनी मिळेल ते साहित्य हातात घेऊन हाणामारी केली. प्लास्टिक बकेट, भाजी वाढण्याचे ओगराळे याच्या सहाय्याने दोघांना बेदम मारहाण केली. कारागृह शिपायांनी दोघांना बाजूला नेले. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेब्रुवारी महिन्यात पुणे, पिंपरी चिंचवडचे उद्योजक नाना गायकवाडवर सोलापूरमधल्या एका आरोपीने कारागृहात हल्ला केल्याची घटना घडली होती. सोलापूरच्या गँगवार मधील देवा नावाच्या कैद्याने पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला करून नाना गायकवाडला जखमी केले होते. गायकवाड सध्या येरवडा कारागृहात मोकाअंतर्गत शिक्षा भोगत आहे. बलात्कार, खंडणी आणि जीवे मारण्याच्या प्रयत्नाचे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सहा वर्षांपूर्वी एका कैद्याने किरकाेळ वादातून दुसऱ्या कैद्याचा डाेक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली होती.

येरवडा कारागृह हे राज्यातलं सर्वात जुनं आणि मोठं कारागृह असून कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांना ठेवण्यात आलेले आहे. यामध्ये खून खटल्यात शिक्षा झालेल्या कैद्यांची संख्या सर्वाधिक आहे.

Share This News
error: Content is protected !!