Ganpati Visarjan

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचताना झाला राडा; पोरांनी ट्रॅक्टर चालकाला लाथा-बुक्क्यांनी तुडवला

1106 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुरुवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणपतीच्या विसर्जनासाठी (Ganpati Visarjan) तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, त्याआधी दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचं भक्तांनी वाजतगाजत विसर्जन केलं आहे. सार्वजनिक गणपती मंडळे मिरवणूक काढत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. यादरम्यान विसर्जनाला गोलबाट लावणाऱ्या काही घटना घडत असतात. सध्या अश्याच एका राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामध्ये काही तरुण विसर्जन मिरवणूक सोडून एका तरुणाला मारहाण करताना दिसत आहेत.

काय घडले नेमके?
विसर्जन मिरवणूक जात असतानाच ट्रॅक्टर ड्रायव्हरने दुचाकीला धडक देत फरफटत नेलं. यानंतर विसर्जनात सहभागी तरुणांनी चालकाला खाली खेचलं आणि बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. जर कोणी तक्रार दाखल केली, तर कारवाई केली जाईल. सध्या दोन्ही पक्षांनी आपापसात प्रकरण मिटवलं आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
गणपती विसर्जनानिमित्त रस्त्यावरुन मिरवणूक निघालेली असते. यावेळी विसर्जन मिरवणुकीत तरुण बेभान होऊन नाचत होते. त्याचवेळी एक ट्रॅक्टर वेगाने येतो. ट्रॅक्टर एका दुचाकीला धडक देतो आणि तिला फरफटत घेऊन जातो. बाईकस्वाराने उडी मारल्याने त्याचा जीव वाचतो. दरम्यान हा अपघात पाहिल्यानंतर मिरवणुकीत नाचणारे तरुण ट्रॅक्टर चालकावर तुटून पडतात. ते चालकाला खेचून खाली घेतात आणि त्याला बेदम मारहाण करतात.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!