Washim Crime

Washim Crime : पत्नीसह आई-वडिलांना करत होता मारहाण; रागाच्या भरात बापाने उचलले ‘हे’ पाऊल एका क्षणात सगळेच संपले

720 0

वाशिम : वाशिम (Washim Crime) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका बापाने आपल्या पोटच्या लेकराचा खून केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (31 ऑक्टोबर) रात्री ही हत्या करण्यात आली. शरद आकाराम सोनोने असं खून झालेल्या 45 वर्षीय मुलाचं नाव आहे. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे.

काय घडले नेमके?
मंगळवारी सायंकाळच्या सुमारास शरदने दारू पिऊन आल्यावर वडिलांसोबत भांडण केलं, तेव्हा रागाच्या भरात बापाने त्याच्या डोक्यावर पहारीने वार केला यात शरदचा जागीच मृत्यू झाला. दारूमुळे पुन्हा एक कुटुंब उध्वस्त झाले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री केली जाते. ती थांबविण्यासाठी महिलांनी वारंवार आंदोलन केले असून दारू विक्री मात्र बंद झाली नाही.

मृत शरदचे आजोबा हे स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचं निधन झालंय, तर 90 वर्षीय आजी अजून जिवंत असून तिला पेन्शन लागू आहे. ही पेन्शन मिळवण्यासाठी शरद आजीलाही त्रास देत होता, अशी माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच धनज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपी बापाला अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!