Washim news

वडिलांनी पोटच्या लेकराचीच केली हत्या; कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

33575 0

वाशिम : वाशिम (Washim) जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील इचुरी गावात एक बाप- लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये एका बापाने जमिनीच्या वादातून पोटच्या मुलाचा कुऱ्हाडीने खून (Murder) केला आहे. या हल्ल्यात आरोपीची पत्नी व 10 वर्षाचा दुसरा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर सध्या वाशिम मध्ये खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना 7 तारखेला मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास घडली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
आरोपी बापाचे नाव नंदू आत्माराम घोडके (Nandu Atmaram Ghodse) असे आहे. त्यामुळे त्याचे वयोवृद्ध वडील आत्माराम घोडके यांनी आपल्या दोन नातवांना जमिनीचे वारसदार बनवले. यात हरिओम घोडके हा आरोपी नंदूचा मुलगा व दुसरा वारसदार म्हणून आत्माराम यांनी मुलीच्या मुलाचे नाव नोंदवले होते. यावरून नंदू घोडके हा दारू पिऊन वडील, पत्नी व मुलाशी नेहमी वाद घालायचा. घटनेच्या दिवशीदेखील असाच वाद झाला.

याच रागातून नंदूने रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास नंदूने पत्नी रेखा घोडके, मुलगा हरिओम घोडके, लहान मुलगा महादेव घोडके यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर आरोपी नंदूने घटनास्थळावरून पळ काढला. शेजाऱ्यांनी तिन्ही जखमींना वाशिम येथे उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान मोठा मुलगा हरिओम घोडके याचा मृत्यू झाला. या प्रकरणी आसेगाव पोलीस स्टेशन (Assegaon Police Station) अंतर्गत गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Share This News
error: Content is protected !!