Nanded News

Nanded News : नांदेड हळहळलं ! शेतात गेलेल्या बाप-लेकाचा तडफडून मृत्यू

736 0

नांदेड : नांदेडमधून (Nanded News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये शेतात गेलेल्या बाप लेकांचा तडफडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

काय घडले नेमके?
दोघेही बाप-लेक शेतीची कामे करण्यासाठी शेतात गेले होते. त्याचवेळी शेताभोवती असलेल्या तारेच्या कुंपणात विद्युत प्रवाह उतरला होता. मात्र, हा प्रकार दोघांनाही माहिती नव्हता. दोघेही नेहमीच्या सवयीने काम करत असतानाचा याच तारेच्या कुंपणाला स्पर्श झाल्याने शॉक लागून दोघांचाही तडफडून मृत्यू झाला. बालाजी मगरे असे मृत वडिलांचे तर दत्ता मगरे असे मृत मुलाचे नाव आहे.

सोमवारी संध्याकाळी दोघेही नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. शेताच्या कडेला पिकाच्या सुरक्षेसाठी लावण्यात आलेल्या तारेच्या कुंपणात पावसामुळे विद्युत प्रवाह उतरला होता. याची दोघांना जराही कल्पना नव्हती. यादरम्यान काम करताना दोघांचा तारांना स्पर्श झाला आणि त्यांना जोराचा विजेचा झटका लागला आणि ते तिथेच कोसळले. बाप-लेकाचा आवाज ऐकून बाजूच्या शेतात असलेल्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा-बाप लेकांनी निपचीत पडलेले पाहून त्यांनी तातडीने त्यांना मुदखेड येथील रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत घोषित करण्यात आले. शेतात काम करत असताना बाप-लेकाचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने मुदखेड तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!