sangli Accsident

घरगुती कामानिमित्त जात असताना बाप-लेकीचा अपघाती मृत्यू

12900 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli) मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये घरगुती कामानिमित्त दुचाकीवरुन चाललेल्या बाप-लेकीचा वाटेतच अपघाती (Accident) मृत्यू झाला आहे. दुचाकीला कारने धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. सांगलीमधील शिराळा तालुक्यातील बिऊर या ठिकाणी हा अपघात झाला आहे. अपघातात मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर वडिलांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
आत्माराम पवार (Atmaram Pawar) आणि तृप्ती पवार (Tripti Pawar) अशी मृत बाप-लेकीची नावे आहेत. तृप्ती पवार ही इंजिनियर असून ती पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करीत होती. ती सुट्टी निमित्त काही दिवसांसाठी ती इस्लामपूर या ठिकाणी आपल्या घरी आली होती. यादरम्यान दोघे बाप-लेक घरगुती कामासाठी इस्लामपूर (Islampur) होऊन कोकरूडकडे निघाले होते. यावेळी भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात तृप्ती हिचा जागीच मृत्यू झाला, तर आत्माराम पवार हे गंभीर जखमी झाले.

त्यांना उपचारासाठी तातडीने शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यानंतर प्राथमिक उपचार करून त्यांना कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र त्या ठिकाणी त्यांचा उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. या भीषण अपघातामध्ये कारचे आणि दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या बाप-लेकीच्या मृत्यूमुळे पवार कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!