Accident News

Accident News : मुंबई -अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; 8 जण जखमी

3059 0

पालघर : पालघरमधून भीषण अपघाताची (Accident News) बातमी समोर आली आहे. मुंबई -अहमदाबाद महामार्गावर बसचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये प्रवाशांनी भरलेल्या भरधाव बसने एका क्रेनला धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. अपघातग्रस्त बस ही गुजरात एसटी महामंडळाची आहे. भरधाव वेगात असलेल्या या बसनं क्रेनला धडक दिली.

दापचरी सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावरील बॅरिगेट्सचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात क्रेनच्या क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बसमधील आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या लोकांना स्थानिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या अपघातामुळे प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. हि धडक एवढी भीषण होती कि यामध्ये बसचं देखील मोठं नुकसान झालं आहे. बसचा समोरचा भाग हा पूर्णपणे डॅमेज झाला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!