Dharashiv

धाराशिवमध्ये बसचा भीषण अपघात ! 26 जण जखमी

407 0

धाराशिव : धाराशिवमध्ये (Dharashiva) एक भीषण अपघाताची (Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये परंडा बस डेपोची (Paranda Depot) बस पलटी होऊन हा अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 26 जण जखमी झाले आहेत. तर बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी परांडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये चालक गंभीर जखमी असल्याने त्याला उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात (Barshi Hospital) हलवण्यात आले आहे. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
परंडा डेपोची ही बस परंडामधून धाराशिवला येत होती. मात्र ही बस सोनगिरी चाकूला परिसरात आली असता, अचानक कंटेनरच्या मागून एक वाहन पुढे आले. वाहन अचानक समोर आल्याने बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि हा भीषण अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

या अपघातात एकूण 26 प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना स्थानिकांच्या मदतीनं परंडा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याला बार्शी येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!