मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण (Accident News) काही कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई-नाशिक महामार्गावरील ट्रक आणि काळी पिवळीचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. खडवली फाट्याजवळ हा भीषण अपघात झाला आहे. खडवली फाट्याजवळ रस्ता क्रॉस करत असताना भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने काळी पिवळीला जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे.
आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 जण जखमी झाले आहेत. या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना तातडीने उपचारासाठी पडघा येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले असून जखमींना खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Selfie : सेल्फी काढण्याचा मोह जीवावर बेतला; 4 तरुणांचा दुर्दैवी अंत
अपघातग्रस्त काळी पिवळी जीप प्रवाशांना जात होती. यादरम्यान आज सकाळी नाशिक महामार्गावरील खडवली फाट्याजवळ या जीपचा भीषण अपघात (Accident News) झाला. रस्ता क्रॉस करत असताना महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, काळी पिवळी जीप सुमारे 60 फूट दूर फेकली गेली. या अपघातात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर 8 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. पडघा पोलिस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.