Accident

ACCIDENT | बारामती-भिगवण रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

300 0

राज्यात सातत्याने वाढत्या अपघाताच्या घटना पाहायला मिळत असून आता अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील बारामती भिगवन रस्त्यावर घडली आहे.

बारामती भिगवन रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटे 03.15 वाजता टाटा कंपनीची हरिअर गाडी नंबर BR 9993 यांचा अपघात झाला असून सदर अपघातामध्ये तक्षु शर्मा (वय 21 रा. दिल्ली) आदित्य कणसे (वय 21 रा. मुंबई) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या वाहनाचा वाहन चालक असणाऱ्या कृष्णा इशू सिंग (वय 21 रा.बिहार) जखमी झाला असून या अपघातात चेष्टा बिश्नोई (वय 21 वर्ष रा. राजस्थान) ही गंभीर जखमी झाली असून हे सर्व रेड बर्डचे विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली असून हे सर्वजण रात्री दारू पिऊन गाडी घेऊन फिरायला निघाले होते अशीही माहिती मिळाली आहे.

Accident Video : धक्कादायक ! पुण्यात अज्ञात वाहनाने गर्भवती महिलेला उडवलं; CCTV फुटेज आलं समोर

Share This News
error: Content is protected !!