Bus Accident

Bus accident : बुलढाण्यात एसटीचा भीषण अपघात; 55 प्रवाशांची बस राजूर घाटात पलटी

910 0

बुलढाणा : राज्यात अपघाताचे (Bus accident) सत्र सध्या सुरूच आहे. मलकापूर- बुलढाणा या बसचा भीषण अपघात (Bus accident) झाला आहे. बसचं ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस राजूर घाटात पलटी झाली. या बसमधून एकूण 55 प्रवासी प्रवास करत होते. या प्रवाशांमध्ये काही विद्यर्थ्यांचादेखील समावेश होता. या अपघातामध्ये दहा ते पंधरा जण जखमी झाल्याचे समजत आहे.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांकडून बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात येत आहे. बसचं ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News
error: Content is protected !!