Nashik News

Nashik News : ‘समृद्धी’नंतर आता नाशिकमध्ये मोठा अपघात, ट्रक-कंटेनरची समोरासमोर धडक

1117 0

नाशिक : आज सकाळच्या सुमारास समृद्धी महामार्गावर भीषण अपघात (Nashik News) झाला. ही घटना ताजी असताना आता पुन्हा मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. मालेगाव परिसरात पुणे- इंदौर महामार्गावर ट्रक आणि दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

काय घडले नेमके?
मालेगाव जवळ पुणे -इंदौर महामार्गांवर ट्रक आणि दोन कंटेनरचा भीषण अपघात झाला आहे. त्यात 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र वाहनावरील ताबा सुटल्यानं हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

ट्रक काचा घेऊन जात होता, हा ट्रक समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकला. त्यानंतर मागून येणारा दुसरा कंटेनर ट्रकला धडकला. या तीन वाहनाच्या विचित्र अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र सुदैवानं कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. या अपघातामुळे मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन त्या अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!