Beed News

Beed News : बीडमध्ये कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात

634 0

बीड : राज्यात अपघाताचे प्रमाण काही कमी होताना दिसत नाही आहे. बीडच्या (Beed News) अंबाजोगाईमधून नुकतीच भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. यामध्ये एक खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असलेल्या कारवर पलटी झाली. या विचित्र अपघातामध्ये चार जण जखमी झाले आहेत. तसेच कार आणि ट्रॅव्हल्सचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वळणावर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने खासगी ट्रॅव्हल्स उभ्या असलेल्या कारवर पलटी झाल्याचा विचित्र अपघात बीडच्या अंबाजोगाई शहरामध्ये घडला आहे. या अपघातामध्ये चार जण किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या अपघातामध्ये ट्रॅव्हल्स आणि कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आज सकाळी 8 च्या सुमारास ही ट्रॅव्हल्स जेव्हा मुख्य चौकात आली तेव्हा ती भरधाव वेगात होती. भरधाव वेगामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि ती समोर उभ्या असलेल्या कारवर जाऊन आदळली. अपघातावेळी कारचा चालक बाजूला उभा असल्यामुळे जीवितहानी टळली. ही दुर्घटना घडली तेव्हा या ट्रॅव्हल्समध्ये चालकासह तीन प्रवासी होते. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!