छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे (Farmer Suicide) प्रमाण वाढताना दिसत आहे. बँकेची कर्ज परतफेडीची नोटीस आल्याने पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील 43 वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. नारायण भाऊसाहेब करंगळ (वय 43 वर्ष) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील शेतकरी नारायण भाऊसाहेब करंगळ यांनी पेरणीसाठी पैठणच्या बँक ऑफ बडोदा बँकेकडून 4 लाख 75 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, आज नारायण करंगळ यांचे हेच कर्ज व्याजासह 7 लाख 11 हजार 940 रूपये झाले आहे. तसेच, हे कर्ज भरण्याबाबत संबंधित बँकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने पीकदेखील आले नाही. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडायचे याच विवंचनेत ते होते. यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली आहे.
काल सायंकाळी नारायण करंगळ हे शेतातून घरी आल्यानंतर त्यांनी शेतातच विष प्राशन केल्याचे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती नातेवाइकांना दिली. नातेवाईकांनी नारायण करंगळ यांना खाजगी वाहनांच्या मदतीने पाचोड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.बाबासाहेब घुगे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले आहे. या घटनेची नोंद पाचोड पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली असून सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ajmal Shareef : स्वतःलाच श्रद्धांजली वाहत ‘या’ प्रसिद्ध इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरची आत्महत्या
Article 370 Verdict : कलम 370 रद्दचा निर्णय कायम, सर्वोच्च न्यायालयाने दिला ऐतिहासिक निर्णय
MNS Protest : मनसैनिक आक्रमक; ‘या’ मागणीसाठी लोणावळ्यात रेल रोको आंदोलन
Winter Season : थंडीचा तडाखा वाढणार; विदर्भासह मुंबईही गारठणार हवामान खात्याने वर्तवला अंदाज