Yavatmal News

Yavatmal News : शेतात आलेल्या महावितरणच्या अभियंत्याला शेतकऱ्याकडून मारहाण

508 0

यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शेतकऱ्यानं वीज वितरणच्या सहाय्यक अभियंत्याला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील पिंपरी-सावित्री या ठिकाणी ही घटना घडली आहे. प्रकाश देहारकर असं या प्रकरणातील आरोपी शेतकऱ्याचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
यवतमाळ जिल्ह्यातल्या पिंपरी -सावित्री येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. प्रकाश देहारकर या शेतकऱ्यानं वीज जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. मात्र वीज जोडणी मिळाली नसल्यानं देहारकर याने तत्पुरत्या स्वरुपात केबल टाकून शेतात सिंचणाची व्यवस्था केली. मात्र ही बातमी वीज वितरण विभागाला कळाल्यानंतर सहाय्यक अभियंता गिरी हे या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गेले.

गिरी यांनी शेतकऱ्यानं तत्पुरत्या स्वरुपात केबल टाकून केलेल्या वीजेच्या व्यवस्थेवर आक्षेप घेतला. त्यामुळे शेतकऱ्याला संताप अनावर झाला. त्यानं संतापाच्या भरात अभियंता गिरी यांना हातात असलेल्या वायरनं मारहाण केली आहे. या प्रकरणात प्रकाश देहारकर याच्याविरोधात राळेगाव पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!