Breaking News
Yavatmal News

Yavatmal News : धक्कादायक ! विजेचा शॉक लागून विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

616 0

यवतमाळ : यवतमाळमधून (Yavatmal News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्याच्या काळी दौलत खान या ठिकाणी विजेचा शॉक लागून एका विद्यूत कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विठ्ठल सिताराम आढाव असे मृत पावलेल्या विद्यूत कर्मचाऱ्याचे नाव आहे.

काय घडले नेमके?
खाजगी लाईनमन विठ्ठल आढाव हा काळी दौ इथल्या वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालय येथील प्रांगणातील विजेचे खांबावर काम करत होता. यादरम्यान अचानक विजप्रवाह सुरू झाल्यानं त्याला विजेचा जबर शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी कनिष्ठ अभियंता यांना जाब विचारला त्यांच्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने संतप्त नागरिकांनी कनिष्ठ अभियंता काकडे यांचेवर रोष व्यक्त केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

IND vs AUS : वर्ल्ड कपच्या फायनलसाठी पीएम मोदींसह ‘हे’ दिग्गज नेते राहणार उपस्थित

Aaditya Thackeray : सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

UPI Payment : UPI युजर्ससाठी महत्वाची बातमी ! 31 डिसेंबरच्या आधी करा ‘हे’ काम अन्यथा यूपीआय नंबर होईल बंद

Share This News
error: Content is protected !!