Nashik crime

नाशिकमध्ये आयशर – कंटेनरमध्ये भीषण अपघात; मायलेकींचा जागीच मृत्यू

566 0

नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) पुन्हा एक अपघाताची घटना घडली आहे. यामध्ये द्वारका-आडगाव उड्डाणपुलावर आयशर आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच या अपघातात कंटेनरचा चालक गंभीर जखमी झाला आहे. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

काय घडले नेमके?
द्वारका ते आडगाव या उड्डाणपुलावर आयशर हा बंद अवस्थेत उभा होता. सकाळच्या सुमारास कंटेनरने आयशरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी कंटेनरच्या चालकाच्या सोबत ड्रायव्हर सीटच्या बाजूला बसलेल्या आई आणि मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच पंचवटी पोलीस (Panchvati Police) स्टेशनचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त कंटेनर हा इगतपुरीहून धुळ्याच्या दिशेने जात होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!