Covid Scam Case

Covid Scam Case : संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरांना अटक; EDची मोठी कारवाई

599 0

मुंबई : कोविड घोटाळा प्रकरणी (Covid Scam Case) सक्तवसुली संचालनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांना अटक केली आहे. त्यांच्यासह आणखी एका डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. आज सकाळी पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे.

कोविड घोटाळा प्रकरणी (Covid Scam Case) ईडीने आज सकाळी सुजित पाटकर आणि डॉ. किशोर बिसुरे यांना अटक केली आहे. किशोर बिसुरे हे बीएमसीचे डॉक्टर आहेत, तसंच दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचे ते डीन होते. दहिसर कोविड फील्ड हॉस्पिटलचा करार सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंटशी करण्यात आला होता अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

Share This News
error: Content is protected !!