Death

Crime News : संपूर्ण गाव हादरलं ! पत्नीने केलेली भाजी आवडली नाही म्हणून पतीने संतापाच्या भरात उचलले ‘हे’ पाऊल

763 0

लखनऊ : एखादी व्यक्ती रागाच्या भरात काय करेल (Crime News) आणि काय नाही याचा काही सांगता येत नाही. अशीच एक धक्कादायक घटना (Crime News) लखनऊ मध्ये घडली आहे. यामध्ये बायकोच्या हातची भाजी आवडली नाही म्हणून पतीने थेट तिलाच संपवले. दारूड्या नवऱ्याने बायकोला जिवंत जाळले असल्याची घटना समोर आल्यावर संपूर्ण गाव हादरलं. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल केली आहे.

काय घडले नेमके?
उत्तर प्रदेशातील बांदा जवळ पीडित महिला रहात होती. जोगमाया असे तिचे नाव असून ती 30 वर्षांची होती. पती मुकेश हा नेहमीच तिला मारहाण करत असे. जेवण चांगल बनवत नाही, भाजीला चव नाही, असे सांगत तो नेहमीच तिचा छळ करत असे पीडित महिलेच्या कुटुंबियांनी सांगितले. घटनेच्या दिवशी देखील (रविवारी) मुकेश हा दारू पिऊन घरी आला आणि बायकोला मारहाण करू लागला. यामध्ये त्याची पत्नी गंभीर जखमी झाली. पीडित महिला तिच्या पतीकडे न मारण्याची विनंती करत होती. मात्र पती काही ऐकायला तयार नव्हता. रविवारी देखील त्याने भाजी चांगली बनली नाही, चव आवडली नाही या कारणावरून पत्नीला बेदम मारायला सुरूवात केली. हा आरोपी पती एवढ्यावरच थांबला नाहीतर त्याने तिच्यावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळलं.

मृत्यूपूर्वी महिलेने दिली जबानी
भाजी चांगली झाली नाही, या कारणायाने पतीने आधी तिला बेदम मारहाण केली आणि नंतर रॉकेल ओतून जिवंत जाळले अशी जबानी मृत विवाहितेकडून मरण्याच्या अगोदर देण्यात आली. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

Share This News
error: Content is protected !!
WhatsApp

WhatsApp

1
Join Us On WhatsApp 😊.
Hide