Chhatrapati Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये 160 कोटींचे ड्रग्ज जप्त; 2 जणांना अटक

438 0

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एका आठवड्यात दुसऱ्यांदा अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात अडीचशे कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यानंतर आता दीडशे कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी आता दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पैठण औद्योगिक वसहातीत डीआरआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पैठण औद्योगिक वसाहतीत असलेल्या अपेक्स मेडीकिम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर डीआरआयने छापे टाकले. या छाप्यात अंमली पदार्थ, सायकोट्रोपिक पदार्थ, 107 लीटर मॅफेड्रोन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्सचे बाजारमूल्य अंदाजे 160 कोटी रुपये इतके आहे. या प्रकरणी कारखाना मालक आणि गोदाम व्यवस्थापकाला अटक करण्यात आली आहे.

सौरभ विकास गोंधळेकर आणि शेखर पगार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. आरोपी सौरभ हा एपेक्स मेडिकेम या कंपनीचा संचालक आहे. तर शेखर गोदाम व्यवस्थापक आहे. एपेक्स मेडिकेमची वार्षिक उलाढाल जवळपास 112 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. या कंपनीत आजपर्यंत किती ड्रग्जचा साठा करण्यात आला, किती विक्री केली गेली याचा तपास यंत्रणांकडून सुरु आहे.

Share This News
error: Content is protected !!